आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:राजेश टोपेंसोबतच्या बैठकीतच मालेगाव पालिका आयुक्तांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीतच आयुक्तांना दिली माहिती

मालेगावचे महापालिका आयुक्त, सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीत आयुक्तही हजर होते. याच वेळी कोरोना चाचणीचा एक अहवाल आरोग्य विभागाकडे आला. त्यात महापालिका आयुक्तांसह पालिकेच्या इतर दोघांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीतच आयुक्तांना दिली. त्यामुळे आयुक्त तत्काळ बैठकीतून बाहेर गेले. स्वॅब दिलेला असतानाही क्वॉरंटाइन होण्याऐवजी आयुक्त बैठकीला उपस्थित कसे होते, असा प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात जालन्यातील ६ जणांसह ८ जवान, स्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर व १८ पोलिसांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...