आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्तांचा निर्णय:पालिकेत आता अधिकाऱ्यांची महासभा अन‌् विषयांना मंजुरी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या साडेपाच महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यासाठी महापाैर, स्थायी समिती सभापतींचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. २५ ऑगस्टला आयुक्तांच्या दालनात विभागप्रमुखांची बैठक होऊन त्यात, विविध विषय महासभा व स्थायी समितीच्या बैठकीप्रमाणे मंजूर हाेणार आहेत.

१५ मार्च २०२२ रोजी महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात आली. प्रशासकीय कार्यकाळात विषय मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ४५२ (अ) नुसार नियमावली निश्चित आहे. त्यानुसार तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी स्वतःच्या अधिकारात प्रस्ताव मंजूर करण्याचे धोरण अवलंबिले होते. आताही डाॅ. पुलकुंडवार असेच काम करणार असले तरी, ते महासभा व स्थायीप्रमाणे सभा घेऊन अधिकाऱ्यांकडून उत्तरे घेतील. दर आठवड्याला स्थायीच्या सभेत ४२ विभागांचे अधिकारी आपल्याशी संबंधित प्रस्ताव नगरसचिव विभागामार्फत मंजुरीसाठी ठेवतील.

आमदारांचे बारीक लक्ष
महासभा व स्थायी समितीचे अधिकार जरी प्रशासकांनी वापरले तरी त्यात काेणता निर्णय हाेताे यावर आमदारांचे बारीक लक्ष आहे. सुदैवाने, राज्यात भाजपची सत्ता असून शहरातील तिन्ही आमदार भाजपचे आहेत. दरम्यान, प्रशासकांनी घेतलेल्या निर्णयावर माजी नगरसेवकांचे बारीक लक्ष असून त्यातून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. शेवट महासभा वा स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवणारे आयुक्तच असतात, त्यामुळे स्वत:च्याच प्रस्तावाला मंजुरी देताना कस लागेल असेही बाेलले जाते.

बातम्या आणखी आहेत...