आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन शैक्षणिक धोरण:चार वर्षांच्या नव्या पदवी अभ्यासक्रमात ‘ऑनर्स’ला प्रत्येकाचाच प्रवेश अशक्य

नाशिक / किशोर वाघएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा करण्यात आला असून, पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम १ वर्षाचा म्हणजे २ सेमिस्टरचा असणार आहे. पण सरसकट ४ वर्षांची पदवी सर्वांनाच घेता येईल, असे नाही. कारण, चाैथ्या वर्षाला रिचर्स डिग्री (संशोधन पदवी) चा अंतर्भाव करण्यात आला असून, ही ‘ऑनर्स पदवी’ राहणार असल्याने प्रत्येक महाविद्यालयात चाैथे वर्ष असेलच असे नाही अन् प्रत्येक विद्यार्थ्याला या वर्षात प्रवेश मिळण्याची शक्यताही कमीच आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी अभ्यासक्रमांचा सुधारित श्रेयांक आराखडा (क्रेडिट सिस्टिम) आणि अभ्यासक्रम नुकतेच जाहीर केले आहेत. फुले विद्यापीठात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (अभियांत्रिकी, बी-फार्मसी) पदवी या चार वर्षांच्याच आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांची पदवी चार वर्षांची होईल. त्यातील अभ्यासक्रमात नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पदवी अभ्यासक्रमांसाठी १६० श्रेयांक निर्धारित केली आहेत. त्यात १२ श्रेयांक अर्थात क्रेडिट हे संशोधन प्रकल्पांसाठी आहे. विद्यार्थ्यांना थेट बहुविद्याशाखीय पद्धतीनुसार आवडीच्या विषयाला प्रवेेश घेता येईल. त्याचे क्रेडिट तो शिकत असलेल्या मूळ विद्यापीठ अन् महाविद्यालयाद्वारे मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्र अन् गुणपत्रकात अंतर्भूत करता येतील.

पदव्युत्तर पदवी ही १ वर्षाचा ४ वर्षे असलेला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम घेता येईल. मात्र तीन वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्धचाही विद्यापीठांच्या स्तरावर विचार सुरू असल्याचे पुणे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

७.५ क्रेडिट ऑनर्ससाठी बंधन पदवी अभ्यासक्रमातील चाैथ्या वर्षात रिसर्च ऑनर्स पदवी अभ्यासक्रम आहे. पण तिसऱ्या वर्षात ७.५ क्रेडिट मिळणे अनिवार्य आहे. ऑनर्स पदवी ही संशोधन पदवी असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम १ वर्षाचा असेल. पण ऑनर्स न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम हा २ वर्षांचाही असेल. विद्यापीठाद्वारे धोरण ठरविले जाईल. - डाॅ. प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

मल्टिपल एन्ट्री-एक्झिट ७ वर्षांत पदवी घेणे बंधनकारक नव्या धोरणात मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटची अत्यंत महत्त्वपूर्ण सुविधा दिली आहे. एकूण ७ वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पहिल्या वर्षानंतर ४६ श्रेयांक प्राप्त करून अभ्यासक्रम सोडून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत ४ श्रेयांकांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. २ वर्षे अभ्यासक्रमांचा ८० श्रेयांक पूर्ण करून उन्हाळ्याच्या सुटीत ४ श्रेयांकांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना पदविका मिळेल. संबंधित विद्यार्थ्याने मध्येच अभ्यास सोडला तर पुढील तीन वर्षांत प्रवेश घेऊन सात वर्षांत पदवी पूर्ण करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...