आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:गोल्फ क्लबच्या पार्किंगमध्ये चार कारच्या काचा फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्फ क्लब मैदान, ईदगाह मैदानाच्या बाजूला शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे पार्क केलेेल्या चार वाहनांच्या काचा फोडून त्यातील रोकड, मोबाइल आणि अन्य वस्तू असा दाेन ते तीन लाखांचा ऐवज चाेरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि श्वेता भिडे (रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोल्फ क्लब मैदान येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या महिलेने एमएच १५ एचक्यू ९७२१ या क्रमांकाची कार पार्क केली हाेती. या कालावधीत चोराने कारची डाव्या बाजूची काच फोडून मोबाइल, रोकड, जॅकेट, वाहनाची कागदपत्रे असा सुमारे २४ हजारांचा ऐवज चोरी केला. शेजारीच पार्क असलेली डाॅ. राजेंद्र खरात आणि प्रवीण कुमार यांच्याही कारचा दरवाजा फोडून रोकड, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरी करण्यात आले. अशाचप्रकारे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अन्य चार वाहनांच्या काचा फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या कारमध्ये वस्तू नव्हत्या. या सर्व कारमालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. वरिष्ठ निरीक्षक सुनील राेहाेकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

आयुक्तांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती, तरीही चोऱ्या एका कार्यक्रमासाठी खुद्द पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित असताना चोरांनी कारच्या काचा फोडून चाेरी केली म्हणजे एकप्रकारे पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा आहे.

सुरक्षेचा अत्यंत अभाव
एवढ्या गर्दीत चोरांनी ४ ते ५ कारच्या काचा फोडून रोकड, मोबाइल चोरी केला. भरवस्तीत चोरीच्या घटना घडल्याने सुरक्षेचा अभाव जाणवतो.
- डाॅ. श्वेता भिडे, कारमालक

बातम्या आणखी आहेत...