आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर साहित्य संमेलन गीतात सावरकर यांचा स्पष्ट उल्लेख, सावरकरांचे नाव टाळल्याने अनेकांनी केला होता निषेध

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या गीतामधून नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामोल्लेख टाळल्यामुळे राज्यभरात संतप्त पडसाद उमटल्यानंतर आता संमेलन गीताच्या ओळींत बदल करून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संमेलन गीताची निर्मिती करण्यात आली. मिलिंद गांधी यांनी लिहिलेल्या आणि संजय गिते यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतात ‘स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितिजावरती’ अशी ओळ होती. यातील स्वातंत्र्याचे सूर्य म्हणजे सावरकर असे संमेलन कारभाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र “इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असताना सावरकरांचे नाव का नाही?’ असा सवाल सावरकरप्रेमी नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे केला हाेता. या संदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर मनसे, अभिनव भारत मंदिरासह भगूर येथील सावरकरप्रेमींनी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करत तीव्र शब्दांत निषेध नाेंदवला हाेता. गुरुवारी संमेलन या गीताच्या आेळीतील ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ हा शब्द बदलून ‘स्वातंत्र्यसूर्य सावरकर’ असे नाव घालून नव्याने त्या गीताच्या आॅडिओ, व्हिडिओ फाइल साेशल माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...