आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स स्पर्धा:दुसऱ्या फेरीतही स्पर्धेकांनी मारली बाजी; 6 स्पर्धकांनी मिळवला विजय

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने, महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स अंजिक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या विविध क्रिडा प्रकारामध्ये नाशिक, पुणे, ठाणे, नगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबईच्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून विविध क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळविले. सदरील आयोजित स्पर्धा नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलच्या सिंथेटिकट्रंक ट्रॅकवर सुरू आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विवेक मोरे, अक्षता शेट्टी, शुभम, देशमुख, जय शहा, दिशा बोरसे, निर्मल यादव या मुलांनी विजय मिळवला आहे. महिलांच्या थाळी फेक प्रकारात नाशिकच्या अमेरा शहाने सर्वात लांब 40.27 मीटर फेक करून विजेतेपद पटकावले. तर महिलांच्या 1500 मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या दिशा बोरसेने 4.54.58 मिनिटात ही रेस पूर्ण करून विजेतेपद मिळविले. पुरुषांच्या 1000 मीटर धावणे प्रकारात कोल्हापूरच्या विवेक मोरेने ( 30.51.14) सर्वातआधी रेस पूर्ण करून विजेतेपद मिळविले. तर पुरुषांच्या भाला फेक प्रकारात नगरच्या शिवम लोहकरेने प्रथम, पुण्याच्या अक्षय घोंगेने दुसरा तर पुण्याच्या महेश काळेने तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू बंगलोर, कर्नाटक येथे दिनांक 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयोजित 63 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

आजचे निकाल :-

पुरुष – 100 मीटर धावणे – 1) विवेक मोरे (कोल्हापूर) 2) प्रवीण खंबाळ (मुंबइ उपनगर) 3) भूपेंद्र बलियन (नाशिक)

100 मिटर हरडल्स आतिश लिंबाडे (रायगड)२) rohan साळुंके (सातारा ) रवींद्र देशमुख

200 मिटर धावणे – 1) जय शाह (मुंबई , 2) राहुल कढ (ठाणे), अक्षय खोत ( पुणे)

भाला फेक – 1) शिवम लोहकरे 2) अक्षय घोंगे ( पुणे) 3) महेश काळे (पुणे)

3000 मिटर स्टीपल चेस – 1) सिद्धां पुजारी (कोल्हापूर), 2) हर्षवर्धन दाभाडे ( सातारा) 3) रोहित झा (नागपूर)

400 मीटर हडल्स – 1) निर्मल यादव ( मुंबई उपनगर), 2) आरनॅल्ड मेंडिस (मुंबई शहर),

महिला – 1500 मीटर धावणे 1) दिशा बोरसे (नाशिक), 2) वैष्णवी सावंत (सातारा), 3)अदिती ठाकरे (नागपूर)

200 मिटर धावणे -1) दिशा वलधारणे (ठाणे) 2) सई सानप ( ठाणे), 3) साक्षी तांबखे ( नागपूर)

400 मिटर धावणे – 1) अक्षता शेट्टी (मुंबई उपनगर),2) (पालघर) 3)थाली फेक – 1) अमेरा शहा (नाशिक), 2) सिद्धी कोरडे (सांगली), 3) कार्तिका कोल्हे (पुणे)

बातम्या आणखी आहेत...