आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर चळवळ:आजच्या स्थितीमध्ये हिंदू हाच देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ; महामंत्री मिलिंद परांडे यांचे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात हिंदूंना स्वत:च्याच देशात उपेक्षित ठेवण्यात आले, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राजकारण केले गेले, मात्र राम मंदिर चळवळीनंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलेला हा प्रयत्न टिकू शकला नाही. सद्यस्थितीत हिंदूंना दुर्लक्षित करून या देशाचे राजकारण होऊच शकत नाही, किंबहुना हिंदू हाच राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.

विहिंपच्या वतीने बांधकाम व्यवसाय व संबंधित संस्थांच्या सदस्यांसाठी आयोजित विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. शंकराचार्य न्यास येथे आयोजित या कार्यक्रमात ‘हिंदू राष्ट्रनिर्मितीमधील बांधकाम व्यावसायिकांचे योगदान’ या विषयावर परांडे यांनी परखड भूमिका मांडली. यावेळी व्यासपीठावर स्वामी श्री कंठानंद, विहिंपचे जिल्हाध्यक्ष विराज लोमटे, केंद्रीय पदाधिकारी एकनाथ शेटे, संजय नगराळे आदी होते. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील, गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

कुंभमेळ्यामुळे सव्वा लाख कोटींची उलाढाल होणार : यंदाचा कुंभमेळा हा २२ महिने चालणार आहे ही स्थिती १९५६ नंतर पहिल्यांदा येत आहे. या सर्व काळात एक लाख तीस हजार कोटींची उलाढाल नाशिकमध्ये होणार आहे, याकडे लक्ष वेधत हिंदूधर्मीय व्यावसायिकांनी अधिकाधिक व्यवसाय आपल्याला कसा मिळेल याकरिता आत्ताच नियोजन करणे अपेक्षित असल्याचे विराज लोमटे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.

जन्मदर २.१ च्या खाली गेला ते संपले जगभरातील विविध धर्मीयांचा जन्मदर आणि त्या तुलनेत हिंदूचा जन्मदर असा विषय मांडताना परांडे यांनी हिंदू समाजासमोरील आव्हानांचाही आढावा घेतला. लोकसंख्या नियंत्रणासारख्या कायद्यांचा विचार करताना व्यावहारिक विचार विसरू नका. मानवतेच्या गोष्टी नक्कीच करा, पण जगभरातील प्रत्येक राष्ट्र जोपर्यंत धर्म, ध्वज आणि सीमा बाळगून आहे तोपर्यंत आपल्याही देशाला या गोष्टींचा विचार करावाच लागेल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...