आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दोन दिवसांत 6 कारच्या काचा फोडून पाच लाखांचे साहित्य लंपास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कारच्या काचा फोडून कारमधील साहित्य चोरी करण्याचे प्रकार सुरू असून दोन दिवसांत ६ कारच्या काचा फोडून कारमध्ये ठेवलेले साहित्य असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला. शहरात टोळी सक्रिय असताना पोलिस यंत्रणा मात्र बेफिकीर असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रवीण देशमुख रा. ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यांची कार एमएच४३ एएफ ५८१२ काॅलेज रोड येथे कृषी नगर येथे उभी केलेली असताना कारच्या डाव्या बाजूची काच फोडून ८६ हजारांचे लॅपटाॅप आणि इतर साहित्य चोरी केले.

थोड्याच अंतरावर असलेली कार एमएच १५ एफटी ५४९४ ची अशाच प्रकारे काच फोडून ३० हजारांचे साहित्य चोरी केले. या घटनेच्या एक दिवसापूर्वी तिडके काॅलनी येथे डाॅ. संकलेच्या यांच्या कारची आणि त्यांचे अोळखीचे डाॅक्टर आणि अन्य एका इसमाच्या कारची कार फोडून सुमारे २ लाखांचे साहित्य चोरी केले होते. याच प्रकारे लवाटे नगरे येथे पुण्याच्या व्यक्तीची कारची काच फोडून लॅपटाॅप चोरी केला होता. पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे शहरात टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे.

पोलिसांची निष्क्रियता, गुन्हेगारी वाढली
शहरात घरफोडी, चोरीच्या घटना घडत असताना आता. कारच्या काचा फोडून साहित्य चोरी केले जात आहे. पोलिस यंत्रणा मात्र या सर्व घटनांनंतरही सुस्त असल्याचे िदसून येत आहे. गुन्हे शाखेचे उपआयुक्तांची नुकतीच बदली झाली आहे. परिमंडळ १ चे उपआयुक्त यांच्याकडे पदभार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...