आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आठवड्यापासून उष्णतेची लाट निर्माण झाली असून, आणखी तीन दिवस ती कायम राहणार आहे. विदर्भात पारा तुलनेने अधिक राहणार असून राज्यात शुक्रवारी अकोला येथे ४२.७ एवढ्या सर्वाधिक तपमानाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकणात उष्णता कमी झाली आहे. त्या तुलनेत विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. सकाळीच कडक उन्हाचा फटका जाणवत असून दुपारनंतर रस्त्यांवर काहीकाळ शुकशुकाट जाणवत आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही कमाल तपमान हे वाढलेले होते. कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये कमाल तपमान हे कायम होते.
यामुळे वाढते उन्हाची तीव्रता
उष्णतेची लाट अँटीसायक्लोनमुळे असू शकते. हवा खाली जाते तशी ती गरम होते आणि कोरडे हवामान आणते. समुद्राच्या वाऱ्याला किनारपट्टीच्या भागात जाण्यासाठी ही कोरडी हवा प्रतिकार करते त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत वाढ होते.
प्रमुख शहरांतील तपमान
अकोला ४२.७
जळगाव: ४२.६
सोलापूर ४१.६
वर्धा ४१.४
परभणी ४१.२
मालेगाव ४०.८
सांगली ४०.४
औरंगाबाद ४०.०
नागपूर ४०.०
कोल्हापूर ३९.५
नाशिक ३९.१
गोंदिया ३९.८
वर्धा ४१.४
अमरावती ४१.०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.