आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहळा:‘साेशल नेटवर्किंग’च्या अवनखेड वाचनालयाचे आज उद्घाटन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल नेटवर्किंग फाेरम आणि दिंडाेरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून साकारलेल्या वाचनालयाचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३) सकाळी १० वाजता या वाचनालयाचे उद्घाटन हाेणार आहे. अवनखेड येथील या वाचनालयासाठी न्यूझीलंडमधून अनुष्का अशाेक भट, कै. विमल शंकरराव खैरनार स्मृतिप्रित्यर्थ खैरनार कुटुंबीय आणि विजया जीवन साेनवणे यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. वाचनालयाच्या या उद्घाटन साेहळ्याला साेशल नेटवर्किंग फाेरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमाेद गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक नागू गांगाेडे यांंची प्रमुख उपस्थिती असेल.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच नरेंद्र जाधव, उपसरपंच मंगेश जाधव, ग्रामसेवक शंकर माळाेदे यांसह ग्रामपंचायत सदस्य आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...