आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन मंदिराचे लोकार्पण:चक्रधर स्वामी मंदिराचे संमेलनात लोकार्पण; २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान महानुभाव संमेलन

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा निवासी साधक, संत व भक्तपरिवाराच्या माध्यमातून भगवान श्री चक्रधर स्वामींचा अष्टशताब्दी जन्माेत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन शहरात रंगणार आहे. २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान होत असलेल्या या संमेलनात गोदाकाठ परिसरातील चक्रधर स्वामी चरणांकित ढगातळी आसन या नूतन मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कथाकथन, प्राचीन काव्यवाचन, कविसंमेलन, कीर्तन, प्रवचन, पंथातील प्रमुख देवपूजा वंदन, संतपूजनादी कार्यक्रम पार पडणार आहे.

अखिल भारतीय महानुभाव संमेलन शहरातील डाेंगरे वसतिगृह मैदान येथे हाेणार आाहे. २९ ऑगस्टला भगवान श्री चक्रधर स्वामीच्या वर्णांकित स्थानकास मंगलस्नान, वस्त्र समर्पण, विडा अवसर, श्रीमद‌्भगवतगीता पाठ पारायण हाेणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता ध्वजाराेहण व त्यानंतर धर्मसभा हाेणार आहे. ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मिरवणूक निघेल. सायंकाळी ५.३० वाजता गाेदाकाठ परिसरातील चक्रधर स्वामी चरणांकित ढगातळी आसन या नूतन मंिदराचे लोकार्पण करण्यात येईल. ३१ ऑगस्टला धर्मसभा, संमेलन होईल. कार्यक्रमासाठी आचार्य प्रवर सुकेणेकरबाबा शास्त्री, चिरडेबाबा, कृष्णराज मराठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

बातम्या आणखी आहेत...