आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोडिंग क्लबची स्थापना:नाशिक कोडिंग क्लबचे संदीप महाविद्यालयात उद्घाटन

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप फाऊंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात नाशिक डिस्ट्रिक्ट टिंकेर्निंग लॅब, नाशिक महापालिका आणि संदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक कोडिंग क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे उद्घाटन शनिवारी (दि. ३०) करण्यात आले. नाशिकमधील सर्व महाविद्यालयांच्या सर्व शाखांमधील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी या काेडिंग क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

कोडिंग क्लब उद्घाटन कार्यक्रमात नाशिकमधील विविध अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी हाेते. प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी क्लबचे उद‌्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामाशिष भुतडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाइटबेस कंपनीचे सीईआे नितीन गुप्ता उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. कामिनी नलावडे यांनी केले. प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी कोडिंगचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. संदीपकुमार झा यांनी संतोष व्यक्त केला. फाउंडेशनचे शैक्षणिक समन्वयक प्रा. प्रमोद करोले यांनी नाशिक कोडिंग क्लबच्या निमित्ताने कॅम्पसमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...