आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पीयूष नाशिककर | महात्मा गांधी साहित्यनगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरसिक, वाचक आणि माय मराठीच्या उत्सव ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारपासून ( ३ फेब्रुवारी) वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी प्रारंभ होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याचे विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे मान्यवर उपस्थित राहतील. सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...