आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:लाखो रुपयांचे नुकसान यामुळे झाल्याच्या घटना; अंबड एमआयडीसीत आजपासून संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), महापालिका आणि एमआयडीसीतर्फे संयुक्तरित्या आजपासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून सकाळी ९.३० वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. अंबड एमआयडीसीत पावसामुळे नाले तुंबू नये. सांडपाणी रस्त्यावरून कंपन्यांमध्ये शिरते, कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा परिणाम होत असतो.

या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून संयुक्तरित्या राबवली जाणारी मोहीम अत्यंत महत्त्वाची मानले जाते. या मोहिमेपूर्वी पालिका तसेच आयमाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण अंबड एमआयडीसीची पाहणी करून स्वच्छतेची ठिकाणे निश्चित केली. जेथे कचरा साचून नाले तुंबले जातात त्या भागात प्राधान्याने ही स्वच्छता होणे अपेक्षित असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...