आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या १८५४ कोटी रुपयांच्या नमामि गोदा प्रकल्पात आता नंदिनी, वालदेवी, वाघाडी आणि कपिला या उपनद्यांचाही समावेश केला जाणार आहे. यामुळे मूळ नद्यांसह उपनद्यांच्या प्रदूषणाचा मार्गही मोकळा होणार आहे. दरम्यान, सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पुढील सहा महिन्यांत यासंदर्भातील प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत केंद्राला सादर केला जाणार आहे.
गेल्या वर्षी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपने नमामि गोदा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी वर्षभरापासून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भाजप सरकार आल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशातच आता नंदिनी, वालदेवी, वाघाडी, कपिला या गोदावरीच्या उपनद्यांचाही या प्रकल्पात करण्याची मागणी पुढे आली होती. त्यावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून या उपनद्यांचा समावेश प्रकल्पात झाल्यास प्रदूषणमुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.परसिरात बांधकामे वाढल्यामुळे तसेच बांधकाम साहित्य थेट फेकले जात असल्याने उपनद्यांचे पात्र संकुचित झाले आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या गटारी सोडण्यात आल्या असून पुढे हेच पाणी मसिळल्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत आहे.
असा आहे नमामि गोदा प्रकल्प : महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या काठच्या सुमारे १५० किमी लांबीच्या मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती, क्षमतावाढ, सुधारणा, नाल्यांमध्ये व उपनद्यांमध्ये वाहणारे मलजल अडविणे व वळविणे - २२५ कोटी, मखमलाबाद, कामटवाडा येथे अनुक्रमे ४५ दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि ५४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलनसि्सारण केंद्र उभारणे - १९८ कोटी, नव्याने विकसित झालेल्या रहिवासी भागात २०० ते ६०० मि.मी. व्यासाच्या मलवाहिका टाकणे - १०० कोटी, नदीकाठ सुशोभीकरण, घाट विकास, हेरिटेज डीपीआर समाविष्ट करणे - ८०० कोटी, मनपा क्षेत्रातील प्रदूषित पाणी मलनसि्सारण केंद्रांच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे - ५०० कोटी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.