आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:व्हॉट्सऑप ग्रुपमध्ये न विचारता समाविष्ट; अल्पवयीन मुलांचा तरुणावर हल्ला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटीच्या विजयनगर परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून दोघा अल्पवयीन मुलांनी ग्रुप अॅडमिन भेटला नाही म्हणून त्याच्या मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. ४) देवी मंदिर ग्राउंड येथे सायंकाळी ४.३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेआहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सायंकाळी ४.३० वाजता दीपक काशीनाथ डावरे (२२) हा तरुण देवी मंदिर मैदानावर क्रिकेट खेळत असताना संशयित दोन अल्पवयीन मुले मैदानावरआली. त्यांनी दीपक डावरेसोबत वाद घातला. शिवीगाळ करत एकाने सोबतआणलेल्या कोयत्याने दीपकच्या पोटावर वार केल्याने त्याचा कोथळा बाहेरआला. इतर मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यातआली. संशयितांना पंचवटी पाेलिसांनी ताब्यात घेतलेआहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरूआहे.

बातम्या आणखी आहेत...