आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षा:‘गट ब’ पद भरती परीक्षा अभ्यासक्रमात ‘महाराष्ट्राचा इतिहास’ विषयाचा समावेश

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या काही महिन्यांत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात गट क ची पदभरती थेट एमपीएससी मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये सकारात्मकता वाढली असताना मोठ्या प्रमाणावर विविध पद भरतीची प्रक्रीयाही राबविली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र अराजपत्रित ‘गट ब’ आणि ‘गट क’ य दोन्ही संवर्गाच्या परीक्षेचा मुख्य अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात आधुनिक भारताचा इतिहास विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.

‘गट क’ संवर्गाची भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे करावी, अशी अनेक वर्षांची परीक्षार्थींची मागणी यंदा आयोगाने पूर्ण केली. तसेच दोन वर्षांतील परीक्षांचे निकालही जाहीर करत ऑप्टिंग आउटसारखे निर्णय घेत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही नोकरीची संधी दिली. आता गत काही वर्षांपासून आधुनिक भारताचा इतिहास, विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास हा अभ्यासक्रम आणि अभ्यास घटक या पदांसाठीच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट कऱण्याचा निर्णय मागील महिन्यातच अंतिम झाला. लागलीच दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीत हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...