आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळिंबाला वाढत्या दराची लाली:आवक घटली, डाळिंबाचा 200 रुपये घाऊक दर; तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादनावर परिणाम

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालविण्याने सध्या डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये डाळिंब कमी प्रमाणात येत असुन ग्राहकांची मागणी देखील पुर्ण होत नसल्याने डाळींबाच्या दरात तेजी निर्माण झाली आहे.

बुधवारी 4 हजार रुपये प्रति क्रेट म्हणजे 200 रुपये किलो डाळींबाची बाजार समितीमध्ये विक्री झाली. तर किरकोळ बाजारात 250 ते 300 रुपये किलो दराने डाळिंब ग्राहकांना उपलब्ध आहे.

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, बागलाण, देवळा, मालेगाव, कळवण, येवला या तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र कसमादे पट्ट्यात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासुन डाळींब पीक धोक्यात आले आहे. राज्यशासनाने व राहुरी कृषी विद्यापीठाने देखील यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंब बागा तोडाव्या लागल्या.

नाशिक कृषी बाजारसमितीमध्ये सध्या नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, कोपरगाव या तालुक्यातुन डाळिंब येत होते, तर औरंगाबाद जिल्ह्यातुन वैजापुर आणि औरंगाबाद तालुक्यातुन डाळिंब विक्रीला येत होते. परंतू सध्या तिकडेही डाळिंब उत्पादनात घट झाल्याने बाजारसमितीमध्येही आवक कमी प्रमाणात येत आहे. बुधवारी गिरणारे येथील धनंजय कारभारी थेटे यांनी 27 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते, तेव्हा त्यांनी मा शेरावाली कंपनीमध्ये संदिप पाटील यांच्या विक्रीला ठेवले तेव्हा प्रति क्रेट 4 हजार रुपये दर मिळाला.

देशातील बहुतांश राज्यामधुन डाळिंबाला मागणी आहे, मात्र डाळिंबाची आवक प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे दरात तेजी आली आहे. सुमारे पंधरा दिवस ते एक महिना भर अशीच परिस्थिती रहाण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतिच्या डाळिंबाला उच्चांकी दर मिळत आहे.- ईश्वर गुप्ता, जय महाराष्ट्र फ्रुट कंपनी

बातम्या आणखी आहेत...