आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर विभागाचे छापे:साखरसम्राट अभिजित पाटील यांच्या कारखान्यांवर धाडसत्र, नाशिक, उस्मानाबादेत आयकर विभागाचे छापे

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरसम्राट अभिजित पाटील यांच्या नाशिक, उस्मानाबाद, पंढरपूर आणि परभणीच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने गुरुवारी एकाच वेळी छापे मारले. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील धाराशिव साखर कारखाना लि. युनिट २ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयकर विभागाचा गुरुवारी सकाळी ६ वाजता छापा पडला असून रात्री उशिरापर्यंत सलग चौकशी सुरू होती. नेहमीप्रमाणे या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात असल्याने चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले हे अद्याप समजले नाही.

डीव्हीपी ग्रुपच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने २५ वर्षांसाठी वसाका कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे. अभिजित पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन कारमधून काही अधिकारी वसाका कारखान्याच्या कार्यस्थळावर आले असल्याचे समजते. हिंदीतून बोलणाऱ्या या अधिकाऱ्यांनी अकाउंट अर्थात लेखा विभागात चौकशीला सुरुवात केली.अभिजित पाटील यांच्याकडे एकूण पाच कारखाने असून धाराशिव कारखान्यासह पंढरपूर तसेच उस्मानाबाद येथील त्यांच्या इतर कारखान्यांवरही तसेच पाटील यांच्या निवासस्थानीही छापा टाकत कारवाई सुरू असल्याचे समजते.

कारखान्यावर पहिल्यांदाच आयकर विभागाचा छापा वसाका कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदाच येथे आयकर विभागाचा छापा पडला असल्याने तालुक्यात या कारवाईची चर्चा जोरात सुरू आहे. यातून काय निष्पन्न होईल ते आताच सांगता येणार नसले तरी सहकार तत्त्वावरचा हा कारखाना २०१८-१९ पासून भाडेतत्त्वावर दिल्याने या कारखान्याला आयकर विभागाला तोंड देण्याची वेळ आल्याने सभासदांसह कर्मचारी व कामगारवर्ग याकडे लक्ष देऊन आहे.

बातम्या आणखी आहेत...