आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विजयनगर, नवीन नाशिकसाठी बसफेऱ्या वाढवा; मनसेची मागणी

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने नाशिक शहर व लगतच्या भागांतील जनतेच्या सोयीसाठी सिटी लिंक बस सुरू केली आहे. नवीन नाशिक येथील विजयनगर परिसरात पूर्वी सुरू असलेल्या एस.टी. महामंडळाच्या वेळापत्रकानुसार बसफेऱ्या बंद झाल्याने परिसरातील नागरिक, व्यावसायिक, कामगार, महिला व विद्यार्थीवर्गाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नवीन नाशिक, विजयनगर ते शहरातील विविध भागांत नियमित सिटी लिंक बस सुरू कराव्यात, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मनसेतर्फे सिटी लिंक व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. याप्रसंगी मनसे शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदीप दोंदे, महाराष्ट्र सैनिक देवचंद केदारे, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे व विजय आगळे, विभाग अध्यक्ष नितीन माळी, चिटणीस कैलास मोरे, संदीप बोरसे, अनिकेत निकम, शंकर कनकुसे व संदीप मालोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापकांनी या मागणीची दखल घेऊ असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...