आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 रुपये वाढ केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी:क्रीडा, नाट्य परीक्षांचे अर्ज छाननी शुल्कामध्ये वाढ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रीय कला, चित्रकला, क्रीडाप्रकारात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. तसा प्रस्ताव महाविद्यालयांकडून विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतो. त्याची छाननी करण्यासाठी रोजंदारी कर्मचारी अतिरिक्त लागतात, त्यासाठी प्रति विद्यार्थी ५० शुल्क आकारण्यात यावे. तसे प्रस्ताव पाठवावेत असे पुणे शिक्षण मंडळाकडून पत्राद्वारे कळवले आहे. त्यावर कलाशिक्षक संघटना रोष व्यक्त करीत आहेत.

दहावी व बारावी परीक्षांमध्ये शास्त्रीय कला (गायन, वादन नृत्य), क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व लोककला, खेळाडू, एनसीसी, स्काउट व गाइड प्रकारात सहभागी होणान्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासाठीचे प्रस्ताव शाळांकडून विभागीय मंडळांना प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्येक प्रस्तावाची छाननी करावी लागते.

प्रस्तावाची छाननी केल्यानंतर प्रस्तावांमध्ये त्रुटी असतात, त्या संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी लागते. यादी अंतिम केल्यानंतर विद्याथ्यांना त्यांच्या ग्रेडनुसार गुण देण्याची कार्यवाही केली जाते. दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता प्रस्तावाच्या छाननी कामासाठी जास्तीचे कर्मचारी लागत आहेत. यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून प्रती विद्यार्थी ५० रुपये शुल्क घ्यावेत, असे बोर्डाने कळवले आहे. शुल्क आकारण्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी असून कलाशिक्षकांनीही राेष व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...