आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस:राज्यात ढगाळ वातावरणाने किमान तापमानात वाढ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा आणि दिंडोरी तालुक्यातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. औरंगाबाद येथे सोमवारी १७.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात ८ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह किमान तापमानात वाढ होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी गायब राहणार आहे. निवडक शहरातील किमान तापमान : औरंगाबाद १७.५, नाशिक १७.८, उदगीर १७.८, मालेगाव २१.६, नांदेड १८.८, पुणे १८.५, परभणी २०.०, बारामती १९.१, जालना १७.०, माथेरान २०.०, जेऊर १९.०, उस्मानाबाद १९.०, महाबळेश्वर १६.७, जळगाव १९.८.

दुसरीकडे, मनालीत बर्फवृष्टीने पर्यटकांची मौज मनाली | पर्यटननगरी मनालीत हिवाळ्यातील पर्यटनाचा हंगाम वेग धरू लागला आहे. बाहेरील राज्यांतून दररोज ६०० पेक्षा अधिक वाहने मनालीत दाखल होत आहेत. लाहुलमधील कोकसरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी उसळली आहे.

बातम्या आणखी आहेत...