आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदिरानगर परिसरातील साईनाथनगर ते गुरूगोबिंद सिंग कॉलेजपर्यंतचा रस्ता अतिक्रमणांमुळे व्यापला आहे. रस्त्याच्या दुतर्फा मात्र दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाजी, फळे व विविध खाद्यविक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहतात. विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणधारकांना मनपाच्या अतिक्रमण विभागाचाच वरदहस्त आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर मोठमोठे शोरूम, दुकाने असताना त्यांच्या वाहनतळांच्या जागा अथवा त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी असलेल्या जागेवरच हे विक्रेते अतिक्रमण करताना दिसून येतात. यामध्ये सर्वाधिक संख्या ही हातगाडीवरील विक्रेत्यांची असते. या विक्रेत्यांकडे खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्यावरच वाहने उभे घेऊन राहतात. रथचक्र चौकात सर्वात जास्त त्रास याचा आहे. त्यामुळे ही वाहने अपघातास कारणीभूत ठरतात. विशेष म्हणजे, हा रस्ता व परिसर नो हॉकर्स झोन घोषित केला आहे. तरीही या ठिकाणी हातगाड्यांचे अतिक्रमण होत असले तरी नियमित मनपाची अतिक्रमण विभागाची गाडी येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पुढे जाते, तोच मागे सर्वच्या सर्व विक्रेते जैसे थे ठाण मांडून बसतात. यामुळे कारवाईवरच संशय व्यक्त होत आहे.
गाळे भाड्याने देत रस्त्यावरच विक्री साईनाथनगर, कृष्णकांत भाजी मंडई येथील बहुतांशी भाजीविक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीसाठीचे गाळे व जागा ही पोटभाडेकरूंना देऊन त्यांच्याकडून त्या जागेसाठी आठशे ते हजार रुपये दरमहा घेतात आणि हेच गाळामालक स्वत: त्याच गाळ्याच्या म्हणजेच ओट्याच्या समोर भाजीपाला विक्रीस बसलेले दिसतात. या प्रकाराचीही मनपाने चाैकशी करून संबंधितांकडून त्यांची जागा खाली करून घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
नियमित कारवाई करा मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने काहीकाळ तिथे नियमित धडक मोहीम राबवून विक्रेत्यांना शिक्षा व दंड केल्यास हा रस्ता वाहतुकीस खुला होईल, पर्यायाने अपघाताच्या घटनाही कमी होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.