आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आराेग्य:सीझर प्रसूतींचे वाढते प्रमाण चिंताजनक, जीवनशैलीतील बदल ठरताेय घातक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गराेदर महिलांची सामान्य प्रसूतीचे प्रमाण कमी हाेत असून सीझर प्रसूती ही सुरक्षित ठरत असली तरीही त्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी महिलांची बदलती जीवनशैली कारणीभूत ठरत असल्याचे मत नाशकातील स्त्रीराेग तथा प्रसूतीराेगतज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचवेळी महिलांनी नियमित व्यायाम, फास्टफूडपासून दूर राहणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘नारी शक्ती’ या उपक्रमांतर्गत कार्यालयात आयाेजित चर्चासत्रात त्या बाेलत हाेत्या. यामध्ये डाॅ. क्षमा अघाेर, डाॅ. श्रद्धा सबनीस, डाॅ. सुरेखा गुंडरे (येणगे) यांच्यासह जाहिरात क्षेत्रात कार्यरत राेहिणी चांदे आणि व्हाइड अँगल इव्हेंट‌्सच्या संचालिका केतकी कमळे आदी उपस्थित हाेत्या. या चर्चासत्रात स्त्रीराेगतज्ज्ञांच्या चर्चेत शहरात खासगी रुग्णालयांमध्ये सीझरचे प्रमाण वाढत असून सरकारी रुग्णालयात मात्र हे प्रमाण फार अत्यल्प असल्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. यात डाॅक्टरांनी सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या युगात शहरी भागातील महिला या नाेकरी अथवा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली फार मर्यादित असतात. तर ग्रामीण महिलांची दैनंदिन कामांचे स्वरूप वेगळे असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली जास्त हाेतात. या चर्चेत जाहिरात आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत उद्याेजिका चांदे यांनीही गायीच्या गाेमूत्रापासून वेगवेगळे पूजा साहित्य निर्मितीची माहिती दिली. हाॅटेल्स, रिसाॅर्टमध्ये हाेणारे शाही विवाहसाेहळे, डाॅक्टरांच्या राष्ट्रीय परिषदांसारखे इव्हेंट व्यवस्थापन करणाऱ्या केतकी कमळे यांनीही त्यांच्या व्यवसायातील बदल आणि त्यांच्या व्यवस्थापनाची माहिती दिली.

काेराेना काळापासून महिला, मुलांचा माेबाइल, लॅपटाॅप, टीव्ही बघण्याच्या वेळेत खूप वाढ झाली आहे. तासन‌्तास माेबाइल बघितल्याने डाेळ्यांच्या विकाराबराेबरच महिलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. त्यातूनच वजन वाढून मॅटाेबाॅलिझम सिंड्राेम, पाेटाचा घेर वाढणे, त्यातूनच मग मासिक पाळीच्या वेळा बदलणे, मधुमेह, रक्तदाबासारख्या विकारांची लागण हाेण्याची शक्यता असते. - डाॅ. क्षमा अघाेर

व्हाइड अँगल इव्हेंट‌्सच्या माध्यामातून नाशकातील माेठ्या हाॅटेल्स व रिसाॅर्टमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार लग्नसाेहळ्याचे माेठमाेठे सेट उभारले जात आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिकतेची जाेड देत इव्हेंटला झळाळी दिली जात आहे. आता केवळ नाशकातच नाही तर राष्ट्रीयपातळीवर देखील माेठ्या शहरांमध्ये इव्हेंटसाठी व्हाइड अँगलला पसंती दिली जात आहे. - केतकी कमळे, संचालिका, व्हाइड अँगल इव्हेंट‌्स

बातम्या आणखी आहेत...