आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संचालक व नाशिक महानगरपालिकेत पदवीधर शिक्षक असलेले गणेश लोहार व त्यांचे पुत्र अथर्व व वेदांत लोहार यांनी सप्त मोक्षपुरी ही 7 हजार कि.मी.च्या सायकलिंग मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. नाशिकमध्ये आल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचिपुरम, उज्जैन व द्वारका ह्या सात मोक्षदायिनि नगरे म्हणजेच मोक्षपुरी मानल्या आहेत. प्रत्येक नगरीचा एक पवित्र व ऐतिहासिक वारसा आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या सायकलिंग मोहीमेेच्या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वज्र बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अशी झाली मोहीम
दि. नोव्हेंबर २०२२ रोजी नाशिकचे काळाराम मंदिर येथून सप्त मोक्षपुरी यात्रा सुरू झाली. ७ हजार कि.मी.च्या सायकलिंग मोहिम बुधवार १६ डिसेंबर २०२२ रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतीय संस्कृती, योग व पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा प्रचार व प्रसार करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश होता. लोहार पितापुत्रांनी पहिल्यांदाच ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
खडतर अशा सप्त मोक्षपुरीची मोहीम 11 राज्यांमधून विविध शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन भारतीय संस्कृती, योग व पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी माहिती दिली. या मोहिमेत लोहार कुटुंबीयांनी नाशिकला लाभलेला सांस्कृतिक वारसा पुरातन अध्यात्मिक धार्मिक महत्त्व देखील ठिकाणी सांगून त्याचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये कुठेही न थांबता त्यांनी ऐतिहासिक पौराणिक दाखले देखील देत संस्कृती सोबतच पर्यावरण पूरक संकल्पना व सायकलिंग चे महत्व देखील विद्यार्थ्यांना पटवून दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.