आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट विभाग:इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरु; ग्राहकांसाठी 24 तास सेवा उपलब्ध हाेणार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरू करण्यात आले असून या ॲपच्या माध्यमातून पी.एल.आय आणि आर.पी.एल.आयचे दरमाह हप्ते ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. ग्राहकांसाठी 24 तास सेवा उपलब्ध हाेणार असून या सुविधेचा अधिकाधिक पाेस्टाच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी आय.पी.पी.बी खाते असणे गरजेचे आहे. खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे. त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शनमध्ये पोस्ट लाईफ इन्शुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनिटांतच भरणा करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून स्टॅण्डींग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रिमियमचा भरणा तसेच ऑटो कटींग देखील करता येणार आहे.

याबरोबरच आर.डी, पी.पी.एफ, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचाही भरणा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे.याबाबतची अधिक माहिती जवळच्या पाेस्ट कार्यालयातून प्राप्त करावी, असे आवाहन असे प्रवर डाक अधीक्षक अहिरराव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...