आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेसाठी घंटागाडी:इंडिया सिक्युरीटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सहा गावांना विशेष भेट

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरीटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस यांच्या सामाजिक दायित्व निधीतुन (सीएसआर) सहा गावांमध्ये कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाडी देण्यात आली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या गाड्यांचे वितरण करण्यात आले.

आयएसपी आणि सीएनपीच्या सीएसआर निधीतुन दरवर्षी सामाजिक उपयोगासाठी मदत केली आहे. त्याचप्रमाणे यंदा काळुस्ते, कोंनांबे, पंचाळे, सांजेगाव, किर्तांगळी आणि गंगाम्हाळुंगी या सहा गावांना 46 लाख रुपयांच्या प्रत्येकी एक अशा सहा घंटागाड्या देण्यात आल्या आहे. यावेळी यु. एस. जिमखाना येथे झालेल्या वितरण सोहळ्याला प्रेस महामंडळाच्या नवी दिल्लीतील मुख्य व्यवस्थापकीय संचालिका तृप्तीपात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, आयएसपी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रविण बनसोडे, सहसचिव इरफान शेख, अशोक जाधव, अविनाश देवरुखकर, राहुल रामराजे, बबन सैद, महाव्यवस्थापक व्यंकटेश कुमार, संयुक्त महाव्यवस्थापक विनोद महरिया, महेश बन्सल, व्यवस्थापक अनुराधा कारळकर, व्ही. पी. काला आदी उपस्थित होते.

यापुर्वी प्रेस सीएसआर निधीतुन अंजनेरी येथील आधारश्रमाला पाण्याची टाकी व जलवाहिनी, सिन्नरला साठ लाखांची तर घोटीला पन्नास लाखांची अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय तयार करून दिले. नाशिकरोडच्या दिव्यांग मुलांना स्कूल बस, बिटको रुग्णालयाला रक्तपेढीसाठी तर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयासाठी सोनोग्राफी मशिन्सकरीता चार कोटींची मदत केली.

बातम्या आणखी आहेत...