आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक सादर:इथर मधून भारतीय ज्ञान; अध्यात्म अन् परंपरेचे दर्शन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीतील परंपरा, ज्ञान व अध्यात्माची ताकद प्रचंड मोठी आहे. याचे प्रभावी दर्शन ‘इथर’ या नाटकाच्या माध्यमातून बघावयास मिळाले.राज्य नाट्य स्पर्धेत सिडकोतील श्री शिवछत्रपती सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २०) प. सा. नाट्यगृहात हे नाटक सादर झाले. राजेंद्र पोळ लिखित व चंद्रवदन दीक्षित दिग्दर्शित या नाटकातून आध्यात्मिक अनुभूतीवर विचार व भाष्य करण्यात आले.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ एका धनाढ्य तरुणीच्या घरी तिच्यावरील उपचारांसाठी येऊन राहतो. ही तरुणी मात्र आध्यात्मिक परिभाषा उकलण्यात गुंतलेली असते. तिला मुक्तीची आस लागलेली असते. विचारांच्या व बोलण्याच्या ओघात तरुणीच मानसोपचारतज्ज्ञामध्ये परिवर्तन घडवून आणते, अशी नाटकाची कथा होती. नीलम पानपाटील, चंद्रवदन दीक्षित यांच्या भूमिका होत्या. प्रकाशयोजना चैतन्य गायधनी, संगीत जय खोरे, रंगभूषा मनीषा गायकवाड, वेशभूषा भारती दीक्षित, पायल जाधव, तर नेपथ्य किशोर आंबोरे, सुनील दीक्षित, समीर जोशी यांचे होते.

बातम्या आणखी आहेत...