आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाईन जाॅब शोधत असाल तर सावध व्हा अशाच प्रकारे इंडिगो कंपनीमध्ये कॅब चालक भरतीची बोगस जाहिरात देत तरुणांकडून ऑनलाईन पैसे उकळवले जात आहे. जिल्ह्यातील सुमारे दिडशे ते दोनशे तरुणांची या सायबर हॅकरने लाखोंची फसवणूक केली असल्याची माहिती फसवणूक झालेल्या तरुणाने दिले. ओझर विमानतळावर रोज 20 ते 25 तरुण विचारपुस करण्यास येत असल्याची माहिती येथील सुरक्षा रक्षकांनी दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले.
याबाबत फसवणूक झालेल्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार मोबाईलवर टेक्स मेसेज आला. यामध्ये इंडिगो विमान कंपनीत विविध पदासाठी भरती होत असल्याचे समजले. ऑनलाईन कॅब ड्रायव्हर या पदासाठी ऑनलाईन अर्ज केला असता समोरील संशयिताचे जाफर लेटर पाठवले. यामध्ये जाॅब मिळाल्यानंतर देशातील कुठल्याही ठिकाणी जावे लागेल. तसेच कामाची वेळ सकाळी 10 ते 6 असेल 25500 प्रती महिना सॅलरी असल्याचे नमुद केले. कंपनीच्या विविध सुविधा दिल्या जातील. 10 मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगत नाशिक विमानतळ येथे सकाळी 9 वाजता रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. प्रशिक्षण कालावधीत उमेदवाराला 40 टक्के वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांनी नाशिक विमानतळावर ओळख पत्र, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, 3 पास पोर्स फोटो सोबत उपस्थित राहावे. संशयित हॅकरने इंडिगो एअरलाईन अथोरीटी ऑफ इंडिया गौरव कुमार याच्या बँक खात्यात 4500 रुपये गणवेशाचे ऑनलाईन भरावे लागेल. कंपनीचा युनिफाॅर्म उमेदवाराच्या पत्त्यावर पाठवला जाईल असे सांगण्यात आले. पाच ते सहा दिवसांपासून नाशिक विमानतळावर उमेदवारांची गर्दी होत आहे. अशी कोणतीही भरती नसल्याने सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
सेवा निवृत्त अधिकाऱ्याची सतर्कता
सेवा निवृत्त पोलिस अधिकारी रवीकांत सोनवणे यांच्या मुलास जाॅब लेटर आले होते. सोनवणे यांनी जाॅब लेटर पाहिल्यानंतर त्यांना संशय आला. त्यांनी नाशिक विमानतळावर प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता येथील संबधित एअर कंपनीत अशी कुठलीही भरती नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी काही तरुणांशी चर्चा केली असता संशयिताचे अशा प्रकारे शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचे समजले. पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला.
बनावट नियुक्ती पत्राने सतर्क
इंडिगो कंपनीत कॅब चालक पदासाठी आॅनलाईन अर्ज केला होता. नियुक्ती पत्र आल्यानंतर वडीलांना सांगीतले. संशय आल्याने विमानतळावर चौकशी केली असता फाॅर्ड असल्याचे समजले. कॉल आलेले सागर सोनवणे यांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.