आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकाच्या खुनाने नाशिक हादरले:अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये थरार; कंपनीच्या प्रवेशद्वारावरच अडवून तलवारीचे वार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नंदकुमार आहेर यांच्या खूनानंतर घटनास्थळीच तलवार टाकून हल्लेखोर फरार झाले आहेत. - Divya Marathi
नंदकुमार आहेर यांच्या खूनानंतर घटनास्थळीच तलवार टाकून हल्लेखोर फरार झाले आहेत.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकाचा तलवारीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. किर्लोस्कर कंपनीच्या जवळ हा प्रकार उघडकीस आला असून, नंदकुमार आहेर असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

कंपनीच्या प्रवेशद्वारावरच हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये नंदकुमार आहेर यांची आहेर इंजिनिअरिंग ही कंपनी आहे. ते या कंपनीचे संचालक आहेत. आज सकाळी नंदकुमार आहेर कंपनीत जात असताना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक

हल्ल्यामध्ये नंदकुमार आहेर गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर कामगार तसेच, नंदकुमार यांचे पुतणे प्रवीण आहेर यांनी जखमी नंदकुमार यांना तत्काळ खासगी रुग्णालयमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंबड पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मृत नंदकुमार आहेर हे एका कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...