आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Industries Minister Uday Samant Assured That Activities Will Be Carried Out Under The Forum Of Maharashtra Chamber To Increase Exports In The State

निर्यात वृद्धीसाठी राज्यामध्ये उपक्रम राबविणार:महाराष्ट्र चेंबरच्या फोरम अंतर्गत उपक्रम राबविणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील व्यापार उद्योगांचा विकास व्हावा व निर्यात वृद्धी व्हावी यासाठी दिनांक 2 ते 11 डिसेंबर 2022 असे दहा दिवस महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पोचे आयोजन केले गेले आहे. महाराष्ट्र चेंबर, महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होणार असून उद्योग विभाग व महाराष्ट्र चेंबर तर्फे निर्यात वृद्धी करण्यासाठी राज्यामध्ये जिल्हास्तरावर इंडिया यूएसए डेव्हलपमेंट फोरमच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अध्यक्ष ललित गांधी यांना दिले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे व महाराष्ट्र चेंबरतर्फे अमेरिकेत झालेल्या बिझनेस समिट व यशस्वी दौऱ्याचे कौतुक केले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांची मंगळवार दि. 6 सप्टेंबर 22 रोजी भेट घेतली. याप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती देऊन जागतिक स्तरावर राज्यातील व्यापार उद्योगाला संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नुकताच अमेरिका दौरा ही यशस्वीपणे पूर्ण केला व अमेरिका येथे झालेल्या बिझनेस समिटची माहिती दिली. भारत अमेरिका व्यवसाय वृद्धीसाठी इंडिया यूएसए डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोमध्ये विविध देशांचा सहभाग राहणार असून भारतातील अन्य राज्य सहभागी होणार आहेत. या दहा दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात तज्ज्ञांचे मार्गदर्शन व केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यापार उद्योगांविषयीच्या योजनांची माहिती सेमिनारद्वारे देण्यात येणार आहे. या एक्स्पोमुळे राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना मिळणार असून प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग व एमआयडीसी यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. शिष्टमंडळात विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगवे, एन्ट्री इंडियाचे नवीन पाठक, प्रभारी सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...