आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योनगरीची व्यथा:नाशिक जिल्हा उद्योग मित्रांची तीन वर्षांपासून बैठक नाही; औद्योगिक वसाहतीतील कामे रखडली

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांत जिल्हा उद्योग मित्र ( झूम) ची बैठक न झाल्याने उद्योजक संभ्रमात आहेत. औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था, पथदीप, नालेसफाई, पाण्याची कमतरता आदी प्रश्नांनी उद्योजक हैराण असून, त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यास झूम बैठक तातडीने घेण्यात यावी अशी मागणी त्रस्त उद्याेजकांनी केली आहे.

जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थापक हे या बैठकीचे समन्वयक असतात, त्यांचीच भेट घेत उद्याेजकांनी या बैठकीच्या न हाेण्याने वाढलेल्या समस्यांची जाणिव त्यांना करून दिली व तातडीने ह्या बैठकीचे आयाेजन करावे अशी मागणी केली. ​अंबड, सातपूर, गोंदे या औद्याेगिक वसाहतीतील, २५०० हून अधिक सदस्य असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांची भेट घेतली.

उद्योजकांचे अनेक मूलभूत प्रश्न आहेत, विविध समस्यांही आहेत, त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणारी झूम (जिल्हा उद्योग मित्र) ची बैठक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. या बैठकीस सर्व यंत्रणांचे अधिकारी आवर्जून उपस्थित राहतात आणि उद्योजकांच्या प्रश्नांची तातडीने उकल होण्यास मदत होते. तीन वर्षात ही बैठक न झाल्याने समस्यांची यादी वाढत चालली आह. यापूर्वीही या बैठकीबाबत दोन निवेदने देण्यात आल्याची आठवणही पांचाळ यांनी यावेळी संबंधितांना करून दिली आहे. शिष्टमंडळात आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब, चिटणीस गोविंद झा, योगिता आहेर, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांचाही समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...