आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास दाैरा:इएसडीएस डाटा सेंटरच्या भेटीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाचा वाढता वापर, आयटी क्षेत्राचा विस्तार या पार्श्वभूमीवर दिल्ली पब्लिक स्कूलच्या नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी डाटा सेंटरच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सातपूर एमआयडीसीमधील इ.एस.डी.एस. डाटा सेंटरला भेट देत विद्यार्थ्यांनी डाटा सेंटरचे कार्य व महत्त्व जाणून घेतले.

स्कूलचे संचालक सिद्धार्थ राजघरिया व प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांच्या संकल्पनेतून या अनोख्या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. डाटा सेंटरच्या भेटीत विद्यार्थ्यांनी कंपनीच्या प्रमुख मार्गदर्शक तत्त्वांची माहिती करून घेतली. तसेच, पॉवर डिस्ट्रिब्युशन युनिट, रॅक, ऑप्टिकल फायबर केबल्स याची माहितीही विद्यार्थ्यांना मिळाली. रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या केबल्स याच फायबर केबल्स असून, प्रकाशाच्या माध्यमातून या केबल्सद्वारे डाटाची देवाण-घेवाण होत असल्याचेही विद्यार्थ्यांना समजले.

डाटा सेंटर क्लाउड स्टोअरेज सेवा पुरवितानाच त्यासाठीची सुरक्षादेखील प्रदान करते. सेंटरचे प्रमुख पीयूष सोमाणी, मोझेस आणि शेरेन यांच्या सहकार्याने ही भेट शक्य झाली. पॉवर डिस्ट्रिब्युशन युनिट, रॅक ही पद्धत डाटा पाठविण्यासाठी उपयुक्त असते. माेबाइलमध्ये देखील ही प्रक्रिया राबविली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाने ही पद्धत अतिशय सुलभ झाली असल्याचे यावेळी डाटा सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अनेक शंका त्यांनी दूर केल्या.

बातम्या आणखी आहेत...