आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे‎ आयाेजन:दिव्यदृष्टी साेशल फाउंडेशनकडून‎ महिला हक्क, कायद्याची माहिती‎‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यदृष्टी सोशल फाउंडेशन व‎ दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा‎ व विकास बोर्ड, प्रादेशिक‎ संचालनालय यांच्या संयुक्त‎ विद्यमाने डिजिटल व‎ फायनान्शियल लिटरसी कार्यक्रमाचे‎ आयाेजन करण्यात आले. अॅड.‎ संदीप गोडसे यांनी महिला हक्क व‎ अधिकारासंदर्भातील विविध‎ कायद्यांची ओळख अतिशय सोप्या‎ शब्दात करून दिली.‎ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले‎ यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्ताने‎ सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस‎ नगरसेवक देवानंद बिरारी यांच्या‎ हस्ते पुष्पहार करून कार्यक्रमाचे‎ उद्घाटन झाले.

दिव्यदृष्टी‎ फाउंडेशनच्या संस्थापिका कल्पना‎ खरात यांनी महापुरुषांना वंदन‎ करून, शिक्षणाचे द्वार खुले‎ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई‎ फुले यांची माहिती दिली. दत्तोपंत‎ ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व‎ विकासासाठी बोर्ड च्या संचालिका‎ सारिका डफरे तसेच प्रादेशिक‎ सल्लागार समिती सदस्य विद्या‎ गडाख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ कार्यावर प्रकाश टाकला तसेच‎ सध्याचा युगातील डिजिटल व‎ आर्थिक साक्षरतेचे महत्व,‎ उपयोगिता, तसेच ऑनलाईन फ्रॉड‎ होऊ नये म्हणून कोणती काळजी‎ घ्यावी यावर माहिती देण्यात दिली.‎

बातम्या आणखी आहेत...