आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविभागातील दुकानदारांना वैध मापन विभागाचे विभागीय सह नियंत्रकांकडून होणाऱ्या त्रासाची नियंत्रक कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून आता सह नियंत्रकांना अस्थापनांना भेटीस जाण्यापुर्वी त्याची माहिती सहनियंत्रक कार्यालयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉ. रविंद्र कुमार सिंगल नियंत्रक वैध मापन शास्त्र महाराष्ट्र यांनी हे आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाणेपूर्वी भेटीचा उद्देश आणि माहिती सह नियंत्रक कार्यालयास आगाऊ देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 2019 मध्ये दिले आहेत. तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन त्याना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या तक्रारींची दखल घेत नाहक त्रास देण्याच्या हेतूने भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली आहे, की नाही याबाबात खातरजमा करण्यासाठी राज्यातील अस्थापना, दुकानदार व्यापारी यांनी 022-22621968 या क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करावी असे आवाहन नियंत्रक वैध मापक शास्त्र डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.
विभाग निहाय येथे करा संपर्क
मुंबई महानगर विभाग- 022-24148484, कोकण विभाग- ठाणे, पालघर, रायगड, सिंधूदुर्ग जिल्हा 022-277574074, पुणे विभाग, सातारा, पुणे, कोल्हापुर, सांगली, सोलापूर जिल्हा 020-26697232 नाशिक विभाग- नाशिक अहमदनग, धुळे, नंदुरबार, जळगाव 0253- 2455696
औरंगाबाद विभाग- औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड 0240- 2952656, अरावती विभाग- अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम- 0721-2990038, नागपूर विभाग- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया- 0712- 2540292
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.