आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसीमध्ये समाविष्ट नसलेल्या दिंडाेरी, जानाेरी, जवळके, गाेंदे, विल्हाेळी, इगतपूरी या औद्याेगिक वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी उद्याेगांना पुर्णवेळ वीजपूरवठा हाेत नाही. याशिवाय रस्ते नाहीत, पाणी पुरवठा विस्कळीत हाेताे तर पथदिप नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. पोलिसांची गस्त देखिल पुरेशी नसल्याच्या विविध समस्या त्या त्या औद्याेगिक वसाहतीतील उद्याेजकांनी मांडल्या.
आयमाच्या पुढाकाराने झालेल्या विशेष बैठकीत आयमाचेे सेक्रेटरी ललित बुब, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, एमआयडीसीचे उपअभियंता यांसह निमाचे माजी अध्यक्ष रवी वर्मा आदी उपस्थित हाेते.
उद्याेगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपुर्वीच आयमाच्या सभागृहात उद्याेजक संघटनांची बैठक घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले हाेते. यानंतर तातडीने मंत्रालयामध्ये या दाेहाेंनी उद्याेजक संघटनांची व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली हाेती. याबैठकीत एमआयडीसीच्या अंतर्गत येत नसलेल्या औद्याेगिक वसाहतींतील समस्यांबाबत आयमाने बैठक घेऊन समस्यांचा अहवाल तयार करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार ही बैठक घेतली गेल्याचे ललित बुब यांनी सांगितले.
यांनी मांडल्या समस्या
जानाेरी येथील उद्याेगांचा विजपुरवठा सुरळीत नसून याला उत्तम पायाभूत सुविधांची उभारणी न हाेणे हे प्रमुख कारण असल्याची तक्रार उद्याेजकांनी केली, निमाचे माजी अध्यक्ष रवी वर्मा यांनी येथील समस्या मांडल्या. मनाेज मुळे यांनी वाडीवऱ्हे, याेगेश पाटील, उमेश काेठावदे यांनी दिंडाेरी येथील समस्या मांडल्या त्यातही मुख्य समस्या, उद्याेगांसाठी वीजपुरवठा, सबस्टेशनला जागा नसणे उद्याेगांना यापुर्वी वीज जाेडण्या दिल्या गेल्या, त्यानंतर सातत्याने वीजेची मागणी व जाेडण्या वाढत गेल्या तरी महवितरणकडून पुरेसे सबस्टेशन्सची उभारणी झाली नाही परीणाम विजपुरवठा अखंडीत मिळत नसून उद्याेगांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी उद्याेजकांनी केल्या.
या चार प्रमुख समस्या आल्या समाेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.