आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पूर्व शिक्षण मान्यता याेजना त्वरित सुरू करा; खा. हेमंत गाेडसे यांची संसदेत मागणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याबरोबरच देशातील विविध क्षेत्रात स्वयंरोजगार करणाऱ्यांना रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंगचे (पूर्व शिक्षण मान्यता) ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेट देण्याचे काम कोविडच्या काळात सुमारे तीन वर्ष पूर्णत: बंद झाले आहे. ते त्वरीत सुरू करावे, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला. कौशल्य विकास खात्याकडून सुरू असलेल्या रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग ही पंतप्रधानांनी आणलेली योजना अतिशय उत्तम असून या योजनेची व्याप्ती वाढावी यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी गोडसे यांनी संसदेत केली.

या प्रश्नावर उत्तर देताना कौशल्य विकास विभागाचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, कोव्हिडमुळे योजनेत अनियमितता झाली आहे. आता लवकरच या योजनेला गती देण्याचे काम सुरु करण्यात येईल. कोविडपासून ही योजना बंद आहे. यामुळे महाराष्ट्रात ५ टक्केच स्वयंरोजगारांना या योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेचा हेतू लक्षात घेऊन ती तातडीने सुरू करण्याची मागणी गोडसे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...