आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकष्टमय जीवन जगत असताना पारमार्थिक आनंदाचे सुख मिळवित मनावर नियंत्रणासाठी दीक्षा आवश्यक असल्याचे प्रतिपादन आचार्यदेव तत्त्वदर्शन सुरीश्वरजी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र कलापूर्णम तीर्थधाम येथे सुरू असलेल्या उपधान पर्वकाळात डोंबिवली येथील हेतकुमार पीयूषभाई दोषी यांचा दीक्षा सोहळा आचार्य हंसरत्न सुरीश्वरजी महाराज व श्री आचार्यदेव सुरीश्वरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात पार पडला.
मुनीवर धर्मध्यान महाराज, शुक्लध्यान महाराज, पुण्यधान महाराज, रत्नाकलश विजयजी महाराज, पद्मकलश विजयजी जीनवात्सल्य महाराज, साध्वी भव्यरंजनाश्रीजी महाराज व सौम्यदर्शनजी महाराज यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. दीक्षार्थी हेतकुमार यांचा ब्रह्ममुहूर्तावर याप्रसंगी प्रेमजी गाला, धनजी गाला, जिनेश गडा, राजू शाह, प्रेमजी छेडा, लालजी कारिया, धामजी फुरिया, पीयूष शाह यांच्यासह अनेक मान्यवर या साेहळ्यास उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.