आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआयसी अधिकाऱ्याला काळे फासण्याचा इशारा:अपघातग्रस्त कामगारांच्या दाव्यांबाबत अन्याय सहन करणार नाही- कामगार संघटना

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईएसआयसीचे सहसंचालक निश्चलकुमार नाग यांना निवेदन देतांना महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संंघटनेचे संस्तापक कैलास माेरे व पिडीत भगवान धाेडी आदी. - Divya Marathi
ईएसआयसीचे सहसंचालक निश्चलकुमार नाग यांना निवेदन देतांना महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संंघटनेचे संस्तापक कैलास माेरे व पिडीत भगवान धाेडी आदी.

इएसआयसी ह्या महत्वाच्या विभागाला सहसंचालक निश्चल कुमार नाग यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीचा जाच अपघातग्रस्त कामगारांना सहन करावा लागत असून दावे नाकारले जात असल्याचा आराेप करत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर काळे फासण्याचा इशारा महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेने दिला आहे.

सदर अधिकारी वेळ देत नसल्याने पाेलीसांना साेबत घेऊन गुरूवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईएसआयसी कार्यालय गाठत नाग यांना निवेदन सादर केले. निच्छलकुमार नाग यांना त्यांच्या कामगार विरोधी कार्य शैली विरोधात आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यापासून कामगार त्रस्त आहेत.

बऱ्याच अपघाग्रस्त कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत व ते जाणून बुजून तसे ठेऊन कामगारांना त्रास दिला जात आहे. कंपनी मालकांना व दलालांना या कार्यालयात प्राधान्य देऊन त्यांना तत्काळ भेट दिली जाते व कामगारांना भेट नाकारली जाते. या वरून नाग यांना कामगारांप्रती प्रचंड घृणा व राग असल्याची जाणीव होते. म्हणूनच अपघात ग्रस्त कामगारांचे दावे हे मालकाच्या सागण्यावरून नाकारले जात आहेत. सद्य स्थितीत बऱ्याच कंपन्यांनी ई एस आय सी भरणे बंद केले आहे, याला कारण दलालामुळे मालक वर्ग बिनधास्त झाला आहे. अपघात ग्रस्त कामगारांना पेन्शन सुविधा मिळणे कठीण झाले आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नीच्छल कुमार नाग यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना काळे फासण्याचा ईशारा देखिल संघटने मार्फत देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक कैलास मोरे, पीडित कामगार भगवान धोडी, सागर सैदाणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...