आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोलिस आयुक्तांची अभिनव संकल्पना; स्मार्ट सिटी, मनपाकडे पाठवला प्रस्ताव

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात प्रथमच आलेल्या नागरिकांना गुगल मॅपवरून रस्त्यांची माहिती मिळत होती. त्यात गुगलने स्ट्रीट फिचर आणल्याने ३६० डिग्रीमध्ये रस्ते दिसत आहेत. रस्ते वा इच्छित स्थळ शाेधण्यात आणखी सुकरता यावी यासाठी आता शहरातील रस्त्यांवरील कलर कोड मार्गदूत ठरतील. यासंदर्भात रस्त्यांवर दर शंभर मीटर अंतरावर विशिष्ट कलर कोड लावण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी आणि महापालिकेला दिल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

शहरात पर्यटक, भाविकांसह विविध क्षेत्रांत काम करणारे नागरिक, विद्यार्थी यांचा शहरात राबता असताे.त्यामुळेच शहरात नव्याने येणाऱ्यांना वा एखाद्या भागात नव्याने जाणाऱ्यांना इच्छितस्थळी न चुकता पाेहाेचता यावे यासाठी कलर काेडिंग महत्त्वाचे ठरणार आहेत. या कलर कोडिंगचा सेंटर पाॅइंट सीबीएस असणार आहे. या कलर काेडिंगमुळे वाहतुक काेंडीही फुटणार आहे. ज्याला ज्या दिशेला जायचे ताे दर शंभर मीटरला त्या रस्त्यांच्या रंगानुसार पुढे सरकेल. त्यामुळे वाहतुक सुरळीत राहील व काेंडीही हाेण्याची शक्यता थाेडी कमी हाेईल.

प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा
शहराच्या विकासासाठी या पायलट प्रयोगाची संकल्पना मांडली आहे. महापालिका आयुक्त, स्मार्ट सिटीकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास शहरासाठी तसेच बाहेरून येणाऱ्या वाहने, नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. - जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त

बातम्या आणखी आहेत...