आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिकनगरच्या नागरिकांचा अधिकाऱ्यांना जाब:पालिकेची जागा असूनही आराेग्य उपकेंद्र नसल्याने रुग्णांची परवड

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर परिसरातील अशाेकनगर, श्रमिकनगर भागासह परिसरातील रुग्णांचे हाल हाेत आहे. या रुग्णांना महापालिकेने मंजूर केलेल्या ठिकाणी आराेग्य उपकेंद्र सुरू न झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. तरी मनपाने तातडीने ही परवड थांबविण्यासाठी मंजूर ठिकाणी प्राथमिक आरेग्य केंद्र सुरू करण्याची मागणी सातपूरच्या मुख्याधिकारी बैरागी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आली.

अशोकनगर, श्रमिकनगर या कामगार वस्ती असलेल्या भागात रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. उपचारांवरील खर्चामुळे सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहेत, अशावेळी महापालिकेचे प्राथमिक सेंटर अशोकनगर, श्रमिकनगर या भागात सुरू झाल्यास नागरिकांना मोफत किंवा अल्पदरात सुविधा मिळू शकतील त्याच्या खिशालादेखील झळ बसणार नाही. या भागातील लोकसंख्येचा विचार करून डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसह केंद्र सुरू करावे, अशी मागणी कॉ. सीताराम ठोंबरे, भागवत डुंबरे, संजय पवार, गौतम कोंगळे, मोहन जाधव, सुभाष कुंभार्डे, नामदेव पवार, अनिल खेडकर, छाया जाधव आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...