आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा:गौणखनिज नोंदणीकृत 3544 वाहनांवर जीपीएस बसवा अन्यथा कारवाई होणार

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध गौणखनिजाची वाहतूक होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. आतापर्यंत जवळपास ४०० लाेकांवर यासंदर्भाने कारवाई करण्यात आली आहे. या सगळयांना आळा बसावा व अवैध उत्खननाच्या घटनांना प्रतिबंध व्हावा याकरीता गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता यापूर्वी.दोन वेळा मुदत वाढवुन देऊनही महाखनिज नोंदणीकृत ३५४४ वाहनांपैकी अवघ्या १३१३ वाहनांवरच जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

जिल्हयातील सर्व खाणपट्टाधारक, क्रशरचालक यांना गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीसाेबत जोडण्यासाठी तहसीलदारांमार्फत यापूर्वीच निर्देश देण्यात आले खरे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील सर्वांनीच याची पुर्तता केलेली नसल्याने, चालक व गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या वाहन मालक यांना जिल्हा प्रशासनाने आता ही यंत्रणा बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या ३१ जुलै पर्यंत गौण गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीशी जोडणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून अथवा

जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील अशा व्यक्तीकडून निरीक्षणाच्या वेळी शिवाय गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळून आली, तर हे उत्खनन व वाहतूक अवैध समजून त्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ ( ७ ) व ४८ (८), तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ व शासनाने दंडाबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

तर कारवाई होणार

ज्या गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांनी जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. जी वाहने जीपीएसवर नाही आणि ती गौण खनिजची वाहतुक करत असतील तर ती अनधिकृत समजून कारवाई केली जाणार आहे. असे नाशिक गौण खनिज अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...