आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:पोलिस परवानगीनंतरच करता येणार पुतळ्यांची स्थापना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेेल्या काही महिन्यांपासून महापुरुषांच्या पुतळ्यांची स्थापना करताना होत असलेले वाद लक्षात घेत महापालिकेने आता पोलिसांची परवानगी असल्याशिवाय पुढील प्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईनाका या वाहतूक बेटावर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांचा पूर्णाकृती पुतळा पोलिसांची परवानगी मिळाल्याशिवाय बसवू नये, अशा सूचना महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात विविध समाजघटकांकडून महापुरुषांच्या पुतळ्यांची स्थापना करण्याची मागणी होत असते. जेणेकरून त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, तसेच समाजामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न असताे. त्यासाठी महापालिका दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूदही करत असते. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा उभारण्याचे मागच्या वर्षी नियोजन होते. परंतु, स्मारकाच्या पुनर्विकासात हा पुतळा राहणार असल्याने हे काम रद्द करण्यात आले. मुंबईनाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूददेखील करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...