आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:उपमुख्यमंत्र्यांचा अवमान; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नाशिकरोडला निदर्शने

देवळाली कॅम्प10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली नाही, असा आरोप करत नाशिकरोडला महिला राष्ट्रवादी संघटनेने निदर्शने केली. दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाने पवार यांना भाषणाची अनुमती नाकारली, पण विरोधी पक्षनेत्यांना मात्र भाषणाची संधी दिली गेली असल्याची टीका आंदोलक महिलांनी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने निषेध करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. देहूमधील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अन् पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा बोलण्याचा मान असताना त्यांचा अवमान केला गेला असल्याचे महिलांनी सांगितले. महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान केला गेला आहे. केंद्राकडून महाराष्ट्राचाच आवाज दाबला गेला तर राज्यात बाेंबाबाेंब करून निषेध करू, असे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले. यावेळी संगीता झांजरे, शीतल भोर, नीलिमा शिरसाठ, संगीता उमाप, भारती भुसारा, अग्नेश गामा, भगूर युवकाध्यक्ष मयूर कस्तुरे, राहुल कापसे, रूपेश झांजरे, शुभम चव्हाण, सुनील उमाप आदी उपस्थितहोते.

बातम्या आणखी आहेत...