आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड औद्योगिक वसाहतीत रक्तपात:आईला अपमानित केल्याने मुलाने काढला कंपनी व्यवस्थापकाचा काटा; पोलिसांच्या तपासात निष्पन्न

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकाचा कंपनीच्या गेटवरच चाकू व तलवारीने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. सात) सकाळी घडली. आईला कामावरून काढून टाकल्याने मुलाने मित्रांच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेत एक मारेकरी जखमी झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अविनाश रामचंद्र सुर्यवंशी (वय 19, रा. मारुती चौक अंबड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मंगळवारी सकाळी 10 वाजेची वेळ, अंबड औद्योगिक वसाहतीतील गंगोत्री समोरील आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर (वय 50, रा.महात्मा नगर) हे आपल्या चारचाकी वाहनातून कामावर आले होते. कंपनीच्या गेटवर गाडी उभी करून ते कंपनी मध्ये जात असताना अगोदरच दबा धरून बसलेले 4 तरुणांनी धावत येत आहेर यांच्यावर तलवार व चाॅपरने हल्ला केला

या आहेर यांच्या डोक्यात पोटात वार झाल्याने जागेवर मृत्यू झाला. आरडाओरड झाल्याने कंपनीतील काही कामगार बाहेर पळत आले. तोपर्यंत हल्लेखोर हातातील हत्यारे तेथेच टाकून दुचाकीवर पसार झाले. अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सूरू केला. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या.

1 जूनला केला वाढदिवस साजरा

व्यवस्थापक नंदकुमार आहेर यांचा नुकताच 1 जून रोजी वाढदिवस झाला. कंपनीतील कामगारांसह सर्वांनी उत्साहात साजरा केला होता. आठवडाभरातच त्यांचा खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अहेर मूळ वडाळी भोई चांदवड येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

हल्लेखोरही झाला जखमी

संशयितांनी अहेर यांना घेरून हल्ला केला. वार करत असताना यातील संशयित अविनाश सुर्यवंशी याच्या मंडी त वार लागल्याने तो जखमी झाला. रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागावकरुन पोलिसांनी संशयिताचा माग काढला होता.

बातम्या आणखी आहेत...