आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मयत ग्राहकाच्या कुटुंबियांना‎ बँकेकडून दोन लाखांचा विमा‎

नाशिक‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलगाव ढगा येथील महाराष्ट्र ग्रामीण‎ बँकेतील खातेदार ग्राहक सोमनाथ‎ नामदेव निंबेकर यांच्या निधनानंतर‎ बँक व्यवस्थापनाने त्यांच्या कुटुंबीयांना‎ प्रधानमंत्री जीवनज्याेती विमा‎ योजनेंतर्गत दोन लाखांचा विमा‎ मिळवून दिला.‎ सोमनाथ नामदेव निंबेकर यांचे‎ अल्पशा आजाराने निधन झाले होते.‎ त्यांच्या खात्यातून प्रधानमंत्री बिमा‎ योजनेसाठी आर्थिक वर्षात ३३०‎ रुपयांची कपात करण्यात आली होती.‎

त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांना बँक‎ व्यवस्थापनाने दोन लाखांचा विमा‎ मिळवून दिला. बँकेच्या ग्राहकांनी‎ आपल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून‎ ही विमा पॉलिसी काढून घ्यावी,असे‎ आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे‎ शाखा व्यवस्थापक भुषण पाटील यांनी‎ केले. बँकेने एका गरीब शेतकरी‎ कुटुंबाला योजनेचा लाभ मिळवून‎ दिल्याने मृत खातेधारक कुटुंबियांच्या‎ नातेवाइकांनी बँक व्यवस्थापनाचे‎ आभार मानले. खातेदाराच्या‎ खात्यातून वार्षिक ४३६ रुपये हप्ता‎ कपात होत असल्यास खातेदाराला हे‎ विमा संरक्षण लागू असून क्लेम‎ सेटलमेटची जबाबदारी बँकेची असते,‎ असे शाखा व्यवस्थापक भूषण पाटील‎ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...