आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांची कोठडीत कबुली:विमाधारक मित्राच्या डोक्यावर राॅडने हल्ला; अंगावर घातली गाडी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राचा खून करून अपघात झाल्याचा बनाव रचत त्याचे विम्याचे चार कोटी रुपये हडप केल्याच्या प्रकरणात संशयितांनी आता मित्र अशोक भालेराव याचा खून केल्याची कबुली दिली आहे. नियोजनबद्ध कट रचून मुंबईहून आल्यानंतर पायी जात असताना संशयितांनी बोलण्याच्या नादात भालेरावला गुंतवून ठेवत त्याच्या डोक्यात लोखंडी राॅडने हल्ला केला. तो रस्त्यावर पडल्यानंतर अंगावर गाडी घालून त्याचा खून केल्याचे संशयितांनी पोलिस कोठडीत सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित मंगेश सावकारने सिनेस्टाइल कट रचत मित्रांच्या मदतीने हा गुन्हा केला. भालेरावच्या नावे विविध कंपन्यांच्या डेथ क्लेमच्या पाॅलिसी काढून त्याच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीचा अपघात दाखवून मयत दाखवत बोगस वारस लावलेल्या महिलेला विम्याची रक्कम देण्याचा कट रचला होता. यात भालेरावही सहभागी होता. मात्र, अनोळखी व्यक्ती मिळत नसल्याने त्यांनी पैसे लाटण्यासाठी अशोकचाच खून केला. या प्रकरणातील संशयित मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, किरण शिरसाठ, हेमंत वाघ, प्रणव साळी हे पोलिस कोठडीत आहेत.

डेथ क्लेमची होती माहिती
संशयित मंगेश सावकार हा विविध विमा कंपन्यांमध्ये डेथ क्लेमची कामे करत असल्याने एखाद्या विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर किती विमा रक्कम मिळते याची पूर्ण कल्पना त्याला असल्याने संशयिताने हा प्लॅन आखला होता. भली मोठी रक्कम मिळाल्याने जीवन सुरळीत होईल या दृष्टिकोनातून भालेराव या कटात सहभागी झाला होता.

विमा पाॅलिसीचा वारस बदलला
संशयित सावकार याने संशयित रजनी उके या महिलेला अशोक भालेरावची बनावट पत्नी दाखवत तिला विमा पाॅलिसीला वारस लावले. यासाठी नाव बदलाचे शासकीय गॅझेटही प्रसिद्ध केले होते. त्याआधारे अधिकृत एकमेव वारस असल्याचे भासवत विम्याचे चार कोटी १० लाख रुपयांचा क्लेम पास केला होता.

बातम्या आणखी आहेत...