आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कॅनोईंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायाच्या संघातील खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाविद्यालयास विजेतेपद मिळवून दिले.
उपविजेतेपद सायखेडा महाविद्यालयास, तर तृतीय क्रमांक के. टी. एच. एम महाविद्यालयास मिळाला. कॅनोईंग फोर प्रकारात 200 मीटर अंतराच्या शर्यतीत पहिले सुवर्णपदक पटकाविताना महाविद्यालयाचे खेळाडू धनेश भडांगे, हेमंत हिरे, अरबाज शेख, साद पटेल यांच्या चमुने अंतिम फेरीत विजेतेपद पटकाविले. मुलींच्या विभागात सी फोर 200 मीटर प्रकारात अनुष्का आंबेकर,अश्विनी वाघ,योगिता शेळके व नेहा घुटे यांनी सुवर्णपदक पटकाविले. सी फोर 1000 मीटर प्रकारात मुलांच्या विभागात प्रथमेश महाले,युवराज जाधव, शुभम हिरे, हेमंत हिरे यांनी विजेतेपद पटकावले. सी टू 1000 मीटर अंतराच्या शर्यतीत सायखेडा महाविद्यालयाच्या भाग्यश्री निफाडे व मेघारानी पवार यांनी विजेतेपद मिळविले.
सर्व विजयी खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी विद्यार्थी गेल्या सहा महिन्यांपासून सराव करत हाेते. अंत्यत चुरशीच्या स्पर्धेत कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायाच्या स्पर्धकांनी उत्कृष्ठ खेळ करत विजेते पदावर आपले नाव काेरले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले,सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल,संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव यांच्यासह प्रशिक्षकांसह खेळांडूनी विशेष यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.