आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाह केल्याचा राग:नवविवाहित दाम्पत्यासह कुटुंबावर सशस्त्र हल्ला; सुरगाणामधील तळपाडा गावातील घटना

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबियांनी नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबियावर हल्ला केल्याचा प्रकार सोमवार दिनांक 6 रोजी मध्यरात्री घडला. नाशिकच्या सुरगाणा येथील तळपाडा गावात हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशन हद्दीपासून 3 किमी अंतरावर हा प्रकार घडला.

नेमके प्रकरण काय?

हल्यात नवविवाहित दाम्पत्यासह कुटुंबियांवर शस्त्राने मारहाण करण्यात आली. यात नवदाम्पत्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी तळपाडा येथील तरुण विजय भास्कर महाले याचे भारती थविल नामक तरुणीसोबत रजिस्टर मॅरेज केले. या लग्नाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. लग्न झाल्याचे थविल कुटुंबियांना समजले. रात्री थविल कुटुंबासह त्यांच्या गावातील 50 ते 60 जणाच्या जमावाने महाले यांच्या घरात घुसून विजय यांच्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली.

पोलिसांनी दिली होती ताकीद

दोघांचे कायद्याप्रमाणे लग्न झाले असल्याने पोलिसांनी थविल कुटुंबियांना ताकीद दिली होती. मात्र, आंतरजातीय विवाह केल्याचे राग असल्याने थाविल कुटुंबियांनी हल्ला केला. मध्यरात्री भारतीचे काका दिनकर प्रभाकर थविल, वडील रघुनाथ प्रभाकर थविल, भाऊ राहुल रघुनाथ थविल आणि बनपाडा गारमाळ गावातील तब्बल 50 ते 60 लोकांनी हल्ला केला. विजय, भारती, भास्कर महाले, हिराबाई महाले हे चौघे झोपेत असताना त्यांच्यावर शस्त्रहल्ला केला. पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

बातम्या आणखी आहेत...