आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतंर महाविद्यालयीन मुलांच्या सॉफ्टबॉल स्पर्धा नुकत्याच लासलगाव महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या. सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ अंतर्गत नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती, द्वारा गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर अंतर्गत स्पर्धा आयोजत करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक सह निफाड, मालेगांव कळवण सटाणा देवळा येवला दिंडोरी चांदवड इ. तालुक्यातील महाविद्यालयातील सॉफ्टबॉल च्या संघानी सहभाग नोंदविला होता. तसेच सॉफ्टबॉल स्पर्धेत एचपीटी - आरवायके महाविद्यालयाच्या संघाने प्रथम एस. एम.महाविद्यालय येवला यांचा 7- 0 ने पराभव करत. नंतर दुसऱ्या सामन्यात 5- 0 ने भोसला मिलिटरी कॉलेजचा पराभव करत. सेमी फायनल मध्ये एल. व्ही. एच. महाविद्यालय पंचवटी यांचा 7- 0 ने पराभव करत अंतिम सामना आयोजक लासलगाव महाविद्यालय विरुद्ध एचपीटी - आरवायके महाविद्यालय यांच्यात झाला अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एचपीटी ने 1- 0 ने सामना जिंकला.
बऱ्याच वर्षापासून सॉफ्टबॉल मध्ये लासलगाव महाविद्यालय व भोसला मिलिटरी कॉलेजचे वर्चस्व राहिले होते. ती परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न एचपीटीच्या संघाने करत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामध्ये प्रामुख्याने रोहन राऊत, अनिकेत येवला, वृषभ वाघ, तुषार सोनवणे या खेळाडू सह संघातील सर्वच खेळाडूंनी कामगिरी चांगली केली त्यामुळे यश संपादन करता आले.
17 व 18 डिसेंबर 2022 रोजी संगमनेर येथे होणाऱ्या आंतर विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघामध्ये तुषार सोनवणे, रोहन राऊत, अनिकेत येवला,वृषभ वाघ या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे विजेत्या संघातील खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. डी.देशपांडे मॅडम, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. स्नेहल मुळे मॅडम क्रीडा विभागाचे तेजस कुलकर्णी, सुरेश कोकाटे आणि जिमखाना सहाय्यक सुरेश शर्मा हे उपस्थित होते.
विजेत्या संघातील खेळाडू पुढील प्रमाणे
1) रोहन राऊत 2) अनिकेत येवला 3) वृषभ वाघ 4) तन्मय पाटील 5) तुषार सोनवणे 6) योगेश मोरे 7) प्रज्वल अण्डोरे 8) ऋषीकेश होले 9) ऋषीकेश मोहिरे 10) निखिल भडोरिया 11) रोहीत पाटील 12) यश सोनार 13) प्रसाद दोरगे
वरील खेळाडूंनी सॉफ्टबॉल मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी सर डॉ. एम. एस. गोसावी साहेब, डॉ. सौ. दीप्ती देशपांडे मॅडम, डॉ. राम कुलकर्णी सर, डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी आदींनी अभिनंदन केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.